खूप दिवसापासून चित्रदुर्ग चा किल्ला आणि त्या सोबतच हळेबिडू, बेलूर या ठिकाणची होयसाळांची मंदिरे बघायची होती पण प्रायव्हेट जॉब मध्ये असलेला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे सुट्ट्या त्या मुळे हा बेत काही लवकर येतच नव्हता. एके दिवशी बॉस चा मूड बघून मी ७ दिवसांची रजा टाकली आणि ती मंजूर हि झाली. एक प्रॉब्लेम सुटला आता दुसरा प्रॉब्लेम म्हणजे बायको, तिला ऐतेहासिक जे काही असते त्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये, फक्त हिल स्टेशन, बीचेस हेच तिच्या मते पिकनिक साठी असतात. प्राचीन मंदिरे, त्यांची शिल्पे यांच्यात बघण्यासारखे काय असते हा तिचा नेहमीच प्रश्न असतो त्यामुळे मी ८ दिवसासाठी कामानिमित्त बेल्लारी ला जातोय तु माहेरी जाऊ शकतेस का? असा बाळबोध प्रश्न विचारला. उत्तर होय येणारच याची मला १००% खात्री होती, माहेरी ८ दिवसांसाठी नवरा दिवाळी शिवाय पाठवतोय म्हटल्यावर जगातील कोणतीही बायको खुश होणारच आणि ७ दिवस आपल्याला मनसोक्त भटकंती करता येईल म्हणून मी पण खुश. मला एकही दिवस वाया घालवायचा नव्हता, त्यामुळे ज्या दिवशी बायको ला गावी पाठवायचे होते त्याच दिवशी मी पण नाईट जर्नी करून पहिले मुक्कामाचे गाव म्हणजेच चित्रदुर्ग गाठण्याचे ठरवले. मला बुकिंग वैगैरे करता येणे शक्य नव्हते कारण बायको ची बस होती रात्री १०:१५ ला आणि बंगलोर जाणाऱ्या बसेस त्याच सुमारास कळंबोली वरून जातात त्या मुळे मी आरक्षण वैगरे न करता बायको ला पाठवून मग पुढचे ठरवता येईल म्हणून बसलो. बायको ची बस आली १०:४५ ला, तिला एकदा बस मध्ये बसवून पाठवली आणि लगेच बंगलोर जाणारी बस कधी येणार याची चौकशी करू लागलो माझ्या सुदैवाने लगेच एक बँगलोर जाणारी बस ११:१५ ला आली, हात दाखवा गाडी थांबवा असा प्रकार होता चित्रदुर्ग ला जाणार का याचे उत्तर सकारात्मक मिळाले त्यामुळे लगेच भाड्याचे विचारून घासाघिस करून ६०० वर फिक्स केले. असा प्रवास थोडासा रिस्की असला तरी वेळ प्रसंगी उपयोगी पडतो. स्लीपर बस नेटनेटकी होती सीट वर पडल्या पडल्या उद्या राहायचे कुठे याचा शोधाशोध सुरु केला. चित्रदुर्ग हे तसे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे हॉटेल्स असले तरी त्यांचे पर्याय हे मर्यादित असणार हे लक्षात आले होते त्यामुळे गुगल मॅपच्या साह्याने किल्ला जेथून जवळ आहे आणि जे हॉटेल स्वस्त आहे बऱ्यापैकी review आहेत ते ४०० रुपयात बुक केले.
कंडक्टर ला किती वाजता चित्रदुर्ग येईल म्हटल्यावर त्याने १० पर्यंत पोहोचू सांगितले आणि सकाळी बरोबर सोडलेही १०:१५ मला चित्रदुर्ग बायपासला सोडले. एकटे फिरायला जाताना मी कपडे शक्य तेवढे कमीच घेतो कारण फक्त बॅकपॅक सोबत असेल तर फिरायला मोकळीक मिळते, मग बॅकपॅक पाठीवर टाकून बायपास वरून शहरात जात असताना एक सद् गृहस्थ बाईक वर जात होते त्यांना हात दाखवला असता कुठे जाणार विचारले, त्यांना हॉटेल चे नाव सांगितले असता त्यांनी हो म्हणून त्यांच्या बाईक वर लिफ्ट दिली. प्रवासादरम्यान त्यांना स्थानिक लोकांमध्ये खाण्यासाठी प्रसिद्ध असलेली हॉटेल्स कोणती ते विचारून घेतले. हॉटेल मौर्या डिलक्स (बुक केलेले हॉटेल) मध्ये बॅग टाकून आंघोळ वैगैरे आटपून मी लगेच बाहेर पडलो, हॉटेल पासून चालत फक्त २ मिनिटे अंतरावर डोसा साठी प्रसिद्ध असलेल्या श्री लक्ष्मी भवन टिफिन रूम मध्ये २ डोसे आणि १ प्लेट इडली असा भरपेट नाश्ता करुन जवळच असलेल्या चित्रदुर्ग किल्ल्याकडे प्रस्थान केले. हा किल्ला भुईकोट आणि डोंगरी किल्ला यांचा सुंदर मिलाप आहे, आपल्या देवगिरी सारखाच असा हा किल्ला सुरुवातीला भुईकोट वाटतो पण चालत चालत गेल्यावर किल्ला त्याचे एक एक पदर उलगडून दाखवायला सुरुवात करतो. पूर्ण आसमंत हा कुणीतरी मोठमोठाले दगड एकत्र करून ठेवावेत तसा दिसतो.
किल्ल्यात वर चढत जात असतानाच मंकीमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले ज्योतिराज हे तेथील एका प्रवेशद्वाराजवळच चित्तथरारक सोलो रॉक क्लाइंबिंग करत होते. निव्वळ हाताच्या साह्याने रॉक क्लाइंबिंग बघणे चित्तथरारक अनुभव होता. त्यांना प्रत्यक्ष भेटून बोलताही आले.

महाभारतातील घटोत्कच आणि त्याची आई हिडिंबा आपल्याला माहित आहेतच, याच हिडिंबा चे हिडिंबेश्वरी चे मंदिर पण याच चित्रदुर्ग किल्ल्यामध्ये आहे, असे म्हटले जाते कि हिडिंबा चा रहिवास हा याच चित्रदुर्ग किल्ल्यामध्ये होता. महाभारतातील तिचे रूप आठवत मंदिर बघितले. दक्षिणेतील मंदिरांचे वैशिष्टय म्हणजे कमालीची स्वच्छता ती सगळीकडे प्रमाणे याही मंदिरात पाहायला मिळाली.
या किल्ल्यातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणजे ओबाव्वा किंडी, हैदर अली च्या सैन्याने या किल्ल्याला ज्या वेळेस वेढा दिला होता त्या वेळेस या गुप्त मार्गाची हैदर अली च्या सैन्याला माहिती झाली आणि त्यांचे सैन्य त्यात गुप्त मार्गातून बाहेर येत असताना तिथेच ओबाव्वा नावाची एका पहारेकर्यांची पत्नी त्या ठिकाणी हजर होती, येणाऱ्या सैनिकांचा आवाज ऐकून तिने लगेच हातात धान्य कांडण्यासाठी जे मुसळ वापरतात ते घेऊन बाहेर येणाऱ्या सैनिकांच्या डोक्यात प्रहार करू लागली, तिच्या त्या समयसूचकते मुळे ते संकट टळले. आज तिच्याच नावाने तो गुप्त मार्ग ओळखला जातो.
जवळपास ४-५ तासात किल्ला आपल्याला निवांत बघता येतो. किल्ला निवांत बघून झाल्यानंतर मी परत हॉटेलवर येऊन आराम केला आणि नंतर चित्रदुर्ग बाजारपेठेत फिरून आलो. उद्या परत सकाळी लवकर उठून मला हळेबिडू ला जायचे होते त्या मुळे बस स्टॅन्ड वर जाऊन हसन ला जाणारी पहिली बस किती वाजता निघते याची चौकशी करून हॉटेल वर येऊन झोपून गेलो.

Nice sir
ReplyDeleteAwesome
ReplyDeleteअप्रतिम....प्रवास वर्णन आणि सखोल माहीती
ReplyDelete