दोड्डागद्दावल्ली येथील लक्ष्मी मंदिर : बेलवाडी येथील वीर नारायण मंदिर बघून तेथील होयसाळांच्या कलाकृतीच्या आठवणी जागवत मी निघालो माझ्या मुक्कामाच्या ठिकाणाला म्हणजे बेलूर ला, बेलवाडी ते बेलूर हे अंतर अंदाजे २८ किमी आहे, कर्नाटक अगोदर खराब रस्ते या साठी बदनाम होते पण माझ्या संपूर्ण प्रवासात मी त्यांनी रस्तायाचा केलेला
कायाकल्प अनुभवत होतो . सगळी टुरिस्ट ठिकाणे त्यांनी चांगल्या पद्धतीने जोडली आहेत. बेलूर मधील samanvi international हे हॉटेल मी GOIBIBO या अँप वरून अवघ्या ५५०/- मध्ये बुक केले होते. हॉटेल रूम अपेक्षे पेक्षा खूपच छान होती, म्हणजे ५५० मध्ये तुम्हाला एकदम स्वच्छ अशी AC रूम आणि सोबत स्टॅंडर्ड toiletries. परत एकदा प्रवासाचा शीण घालवावा म्हणून आंघोळ केली आणि लगेच तयार होऊन दोड्डागद्दावल्ली येथील लक्ष्मी मंदिर बघायला निघालो. बेलूर-हसन या मुख्य रोडवर बेलूर पासून २० किमी अंतरावर मुख्य रोडपासून हे गाव २.५ किमी आत आहे. वेळेअभावी एका रिक्षावाल्याला २०० रुपये देऊन मंदिर दर्शन आणि परत मुख्य रोडवर सोडायचे बोलणी करून घेऊन गेलो.
मंदिरात ज्या वेळेस गेलो त्या वेळेस मंदिर परिसरात माझ्या शिवाय कोणीही नव्हते. शांत वातावरणात ऐतेहासिक मंदिरे बघणे काही औरच अनुभव असतो. हे मंदिर होयसाळ शैलीमध्ये बनवलेले पहिले मंदिर आहे. मंदिर चतुष्कोट म्हणजेच चार मुख्य देवतांचे गाभारे असलेले आहे. मंदिराला एक प्रदिक्षणा घालून बाह्य भागावर असलेल्या सर्व शिल्पकृती बघून झाल्यानंतर गाभाऱ्यात प्रवेश केला, मुख्य गाभाऱ्यात असलेल्या लक्ष्मीदेवी च्या मूर्तीकडे माझे लक्ष होते, काली चा सौम्य अवतार असलेली ती मूर्ती बघत मी गाभार्याच्या एकदम जवळ गेलो आणि मग मूर्ती बघून वळतो तर अक्षरशः अंगावर काटा आला. एकतर मंदिरात माझ्याशिवाय कोणीही नव्हते आणि दुसरं म्हणजे ज्या द्वारपालांच्या मूर्ती बघून अंगावर काटा आला तसे द्वारपाल मी आतापर्यंत कधीच बघितले नव्हते. ६ फूट उंचीचे अक्राळविक्राळ भूतनाथ आणि प्रेतनाथ बघून भल्याभल्याना घाम फुटेल. बाकी मंदिरात अप्रतिम छताचे कोरीव काम बघण्यासारखे आहे. मंदिर बघून झाल्यानंतर परत बेलूर ला पोचलो आणि सरळ चेन्नकेशवा मंदिर गाठले.