बेलूर येथील चेन्नकेशव मंदिर संध्याकाळी आणि सकाळी अश्या दोन्ही वेळेस बघून झाल्यानंतर मी निघालो होयसाळ साम्राज्याची राजधानी असलेली प्राचीन द्वारसमुद्र नगरी आणि आताचे गाव हळेबिडू, द्वारसमुद्र हे नाव मागे पडून हळेबिडू (उध्वस्त शहर) हे नाव या शहराला पडण्यामागे कारण आहे ते दिल्लीच्या मुस्लिम आक्रमकांनी लढाई नंतर केलेला या राजधानीचा विध्वंस. असे सांगितले जाते कि या एकाच शहरात किमान ८०० मंदिरे होती आणि एक प्रशस्त मोठा तलावही होता, आता ना ती ८०० मंदिरे आहेत ना तलाव हि अगोदरच्या दिमाखाने आहे. भर दुपारी मी मंदिराच्या प्रागंणात पोचलो, तिथेच बाजूला पुरात्तव खात्याने सापडलेल्या मूर्तींचे एक संग्रहालय उभारले आहे. त्या संग्रहालयाच्या प्रांगणात बाहुबली सदृश एक मूर्ती ठेवली आहे. होयसाळ राजे हे हिंदू, जैन या दोन्ही धर्माचे पालक असल्यामुळे हळेबिडू मध्ये हिंदू मंदिरासोबत जैन मंदिरे पण आहेत.
मंदिराची रचना हि तारकाकृती आहे त्यामुळे शिल्पकारांना मंदिरच्या बाह्य अंगावर आपली शिल्पकला दाखवण्यासाठी भरपूर मोकळी जागा उपलब्ध झाली आणि त्या उपलब्ध जागेच एवढा सुंदर उपयोग तुम्हाला जगात कोठेही आढळणार नाही, रामायण, महाभारत तसेच पुराणातील प्रसंगावर या ठिकाणी शेकडो शिल्पकृती केलेल्या दिसून येतात, रावण आपली पूर्ण ताकत लावून कैलास पर्वत उचलतोय तो प्रसंग तर एवढ्या बारकाईने घडवला आहे कि आपण त्यातील डिटेल्स बघून अचंबित होतो, पर्वत रावणाने उचलल्या मुले कललेली पार्वती, तिला धरून ठेवलेला शिव, आकाशातुन बघणारे देवगण, कैलास पर्वतावरील वृक्ष, प्राणी या सगळ्यांचे अगदी यथार्त रूप येथे शिल्पकाराने कोरले आहे.
वर दाखवलेल्या फोटो मध्ये गजासुर वधाची गोष्ट शिल्पकाराने इतकी अकल्पनीय डिटेल्स मध्ये दगडामध्ये कोरली आहे कि आपण अचंबित होऊन जातो गजासुराचे पॉट फेडताना दाखवताना शिवाच्या बोटांची नखे सुद्धा शिल्पकाराने दाखवली आहेत.
मंदिराचे द्वारपाल एवढे अलंकृत आहेत कि त्यांना पाहतच बसावे असे वाटते, त्यांचे हात जरी विध्वंसकर्त्यानी तोडले असले तरी त्यांचे खंडित रूपहि मनाला भुरळ पाडते. मंदिर निवांत ३-४ तास बघून झाल्यानंतर मी होयसाळेश्वर मंदिरापासून अंदाजे १ किमी अंतरावर असलेल्या जैन मंदिरांना आणि तिथून पुढे ५०० मीटर अंतरावरील केदारेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी निघालो.
होयसाळ राजवंशाने हिंदू आणि जैन या दोन्ही धर्माना राजाश्रय दिलेला होता याची प्रचिती येते ती येथे असलेल्या शांतीनाथ, पार्श्वनाथ आणि आदिनाथ यांच्या जैन मंदिरांनी. मंदिरामध्ये होयसाळ शिल्पकलेचे वैशिष्ट्य असलेली नक्षीदार गोलाकार खांब सोबतच आहे पार्श्वनाथांची आणि शांतीनाथांची १८ फूट उंच मूर्ती.
जैन मंदिर बघून झाल्यानंतर तिथून जवळच असलेले केदारेश्वराचे मंदिर पण बघितले. सध्या पूजा अर्चा बंद असलेले पण पूर्ण बाह्यभागावर शिल्पकलेने समृद्ध केदारेश्वर मंदिर बघून हळेबिडू ला पुन्हा भेटूच असे म्हणून निरोप दिला.
पुढचा स्टॉप होता अर्शिकेरे, तिथून मग बदामी ला जाण्यासाठी ट्रेन पकडायची होती, अर्शिकेरे या ठिकाणी पण कलमेश्वराचे होयसालकालीन मंदिर आहे, ते मंदिर बघून मी बदामीला निघालो.
मी मंदिर परिसरात भर दुपारी पोचलो त्यामुळे गर्दी कमी होती खुप, बूट काढून ठेवल्या मुळे पाय भयानक भाजत होते परंतु मंदिराच्या प्रदिक्षणा मार्गावर सतरंजीच्या पट्ट्या ठेवल्यामुळे गैरसोय होत नव्हती. संपूर्ण मंदिरावर शिखर नाहीये त्याचा विध्वंस केला गेला त्याची ती एक खूण आहे.
हे मंदिर द्विकूट म्हणजेच दोन मुख्यदेवताचे गाभारे ह्या प्रकारातील असून होयसाळेश्वर या नावाने एक शिवलिंग आणि गाभारा आहे आणि शांतालाश्वर या नावाने दुसरा गाभारा आहे, दोन्ही गाभाऱ्याच्या बाहेर पूर्व दिशेला दोन मोठाले नंदी असून त्यान्ची उंची ६-७ फूट एवढी आहे, नंदी विराजमान असलेली जागा गोलाकार खांब असलेल्या मंडपाने आच्छादित आहे.